Saturday, August 20, 2016

Neelam Suresh Mhaske: (Un)SIMPLE Man

Neelam Suresh Mhaske: (Un)SIMPLE Man: Back then in the era of Indira Gandhi, she leaded the movement of ‘Gareebi Hathao, Desh Bachoa’ to combat poverty. Even now in the age of ...

Monday, August 15, 2016

dnyandayini educational and social org.

ज्ञानदायिनी  शैक्षणिक  व  सामाजिक  संस्था , ही  झोपडपट्टीतिल आणि  ग्रामीण  भागातील  मुलांना  शिकवण्याचे कार्य गेली  १५ वर्षे  करीत आहे हे काम करत असताना आलेले अनुभव आणि  संस्था निर्माण  कशी झाली ते मी  आपल्याशी शेअर करणार आहे.
                 माझे शिक्षण व जन्म  एका खेडे गावात झाले आई वडील शेतमजुर घरात अठरा विश्व दारिद्र खाण्याचे वांदे आशा कुटुंबात जन्म झाला आणि शिकण्याची आवड .  गावातच माझे शिक्षण इयत्ता ७ वि परेंत गावातच झाले आणि सामाजिक कार्याची सुरवात गावातूनच झाली ती मी सातवीला  असताना माझ्या गावात चारीही बाजूला दारूचे अड्डे आणि जुगाराचे अड्डे शाळेतून येता जाता झिंगणारी लोक गावातील मुलींना स्त्रियांना शिव्या देणे भांडणे करणे वाईट नजरेने पाहणे आशे प्रकार दररोज पाहावे लागायचे आणि मनात खूप राग यायचा परंतु मी काय करू शकत नव्हतो मनात आसवास्त व्हायचो . एका दिवशी ठरवले आपण पत्र लिहून जिह्ल्याच्या पी एस आय म्हणजे पोलीस स्टेशनला गावातील सर्व प्रकार कळवायचा ते मी पत्र लिहून पाठवले परंतु एक महिना गेला दोन महिने गेले तरी काही कोणीही आले नाही मी नाराज झालो आणि तिसऱ्या महिन्यात मी शाळेत घरी येत असताना गावाला छावणीचे स्वरूप आले होते जेवढे गुत्ते अड्डे होते तेवढे उद्धवस्त करून पोलीसानी सगळे जप्त केले ,आज माझ्या गावात तेव्हापासून अड्डा मुक्त झाले . परंतु आज ही कुणाला कळले नाही की हे कुणी केले . आशा तऱहेने माझ्या सामाजिक कार्याला सुरवात झाली . आज मी इथेच थांबतो .
     मधुकर सरवदे
ज्ञानदायिनी शैक्षणिक सामाजिक संस्था पुणे
 ९७६५२१३५२३ /९४२१९६१०१५